कांदा आवक घटली, दरात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:27 PM2019-11-13T14:27:17+5:302019-11-13T14:27:37+5:30
वणी : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी येथील उपबाजारात कांद्याच्या आवकेत घट झाली मात्र दरात तेजीचे वातावरण कायम राहिले.
वणी : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी येथील उपबाजारात कांद्याच्या आवकेत घट झाली मात्र दरात तेजीचे वातावरण कायम राहिले. ७२ वाहनांमधुन १५०० क्विंटल कांद्याची आवक उपबाजारात झाली. कमाल ५५९१, किमान ३७०० तर ४९०० रूपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला. किरकोळ बाजारात तर मोठ्या आकारमानाचा दर्जेदार कांदा दिसेनासा झाला आहे. छोट्या आकाराचे कांदे खरेदी सध्या गृहीणीवर्ग करत आहे. कारण परराज्यात छोट्या आकारमानाच्या कांद्याला तुलनात्मक तितकीशी मागणी नाही. तसेच दरातही मोठी तफावत असल्याने किरकोळ भाजीविक्रेते हॉटेलचालक हा कमी दराचा कांदा खरेदी करण्यास अग्रक्र म देतात. दरम्यान, कांदा खरेदी विक्र ी व्यवहाराच्या तेजीच्या स्थितीमुळे संलग्न व्यवसायांना अनुकुलता असल्याचे चित्र दिसते आहे.