इजिप्त अन‌् तुर्कस्तानचा कांदा नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:54 PM2020-11-07T23:54:31+5:302020-11-08T01:34:20+5:30

पिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने केंद्र शासनाने राज्यातील कांदा उत्पादकांचा ऐन दिवाळीत वांदा केला असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Onion of Egypt and Turkey in Nashik | इजिप्त अन‌् तुर्कस्तानचा कांदा नाशकात

पिंपळगावच्या बाजार समितीत दाखल झालेला तुर्कस्तानचा कांदा.

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळगाव बाजार समिती : राज्यातील शेतकरी चिंतित

गणेश शेवरे
पिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने केंद्र शासनाने राज्यातील कांदा उत्पादकांचा ऐन दिवाळीत वांदा केला असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यासह देशातील बेंगलोर, इंदूर येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र अवकाळी पावसाने लाल कांद्याच्या पिकाची मोठी नासाडी झाल्याने लाल कांद्याचे आगमन लांबले, परिणामी मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे पोहोचले. आता केंद्र शासनाने थेट तुर्की, इजिप्तच्या कांद्याची आयात केल्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे.

शनिवारी पिंपळगाव बाजार समितीत दाखल झालेल्या तुर्कीच्या कांद्याला सरासरी दीड हजार रुपये, तर स्थानिक कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तुर्कीचा कांदा दरावर दबाव आणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तुर्कस्थानचा कांदा बेचव....
तुर्कस्थानचा कांदा शनिवारी पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे बाजार घसरण दिसली. गतवर्षी हा कांदा भारतात आला होता. पण उग्र वास, बेचव होता. चवीला समाधानकारक नसल्याने तुर्कीच्या कांद्याकडे नागरिक पाठ फिरवतील, असे सांगितले जात आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विक्रीसाठी आलेला तुर्कस्थानचा कांदा.
उन्हाळ कांदा
- कांदा : क. कमी- १९००, जा. जास्त- ५७००, सरासरी- ४२५१.
- गोल्टी : क. कमी- १०००, जा. जास्त- ३४९०, सरासरी- ३२००.
- खाद : क.कमी-५००, जा. जास्त-२४०१, सरासरी-१७०१.
लाल कांद्याचे दर
- कांदा : क. कमी-२००१, जा. जास्त-५५००, सरासरी-४३०१.
- गोल्टी : क. कमी-५००, जा. जास्त २९२०, सरासरी-२५५१.

बाहेरून कांदा आयत करून कांदा उत्पादकांचा केला घात.....
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र अवकाळी पावसामुळे लाल कांद्याच्या पिकाची मोठी नासाडी झाली. त्यामुळे लाल कांद्याचे आगमन लांबल्याने मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. हे दर वाढतच असल्याने त्या कांद्याच्या तेजीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र शासनाने स्थानिक शेतकऱ्यांचा घात करत थेट तुर्की, इजिप्तच्या कांद्याची आयात केली.
 

Web Title: Onion of Egypt and Turkey in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.