लासलगाहून ४८० मे.टन बांगलादेशला कांदा निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 02:33 PM2020-07-23T14:33:53+5:302020-07-23T14:34:14+5:30
लासलगाव : मागणी वाढल्याने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगाव बाजारपेठेतून प्रथमच रेल्वेच्या पार्सल व्हॅनदवारे ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातिसाठी रवाना करण्यात आला.
लासलगाव : मागणी वाढल्याने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगाव बाजारपेठेतून प्रथमच रेल्वेच्या पार्सल व्हॅनदवारे ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातिसाठी रवाना करण्यात आला. या उच्च क्षमता असलेल्या पार्सल व्हॅनमध्ये पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नसल्याने कांद्याचा प्रतवारी टिकवुन राहण्यास मदत होणार आहे. यापूर्वी प्रवासी रेल्वे गाड्यांना पार्सल बोगी जोडत भाजीपाला,फळे आणि इतर मालाची वाहतूक होत असत. आता प्रथमच लासलगाव रेल्वे स्थानकातुन पार्सल व्हेनच्या माध्यमातून कांदा बांगलादेश साठी रवाना करण्यात येत आहे. २० पार्सल व्हॅनच्या माध्यमातून ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशमधील दर्शना येथे जाण्यासाठी मध्यरेल्वेच्या लासलगाव रेल्वे स्थानकातुन कांदा लोडींगचे काम सुरू आहे. कांदा पार्सल व्हॅनमध्ये लोड केला जात असल्याने येणार्या दिवसात अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळणाऱ्या कांद्याचे भावात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.