कांदा निर्यातीतून २४३४ कोटी रुपयांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:26+5:302021-06-02T04:13:26+5:30
लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉकडाऊन असतानाही देशातून एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याची १४ लाख ०४ ...
लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉकडाऊन असतानाही देशातून एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याची १४ लाख ०४ हजार मैट्रिक टन इतकी निर्यात झाली असून, कांदा निर्यातीतून २४३४ कोटी रुपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला कोरोना काळात चांगलेच चलन परकीय मिळाले आहे.
देशात मागील वर्षी कांदा दरात वाढ झाल्याने केंद्राने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदी लादली होती. यानंतर केंद्राने तबल १०५ दिवसांनंतर निर्यात बंदी उठवली होती. साडेतीन महिन्यांच्या निर्यातबंदीनंतरही कांदा निर्यात समाधानकारक झाल्याचे आकडेवारीनुसार दिसत आहे.
ग्राहकांच्या हिताचा विचार करून कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने १४ सप्टेंबर रोजी निर्यातबंदी जाहीर केली होती. या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. याआनुषंगाने शेतकरी संतप्त होते. मात्र उन्हाळ कांदा संपुष्टात येत असताना केंद्राने पुन्हा निर्यातबंदी मागे घेण्याची अधिसूचना जाहीर केल्याने कांदा निर्यात सुरू झाली असून, या आर्थिक वर्षात १४ लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात होऊन २४३४ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे.
देशाची ऐकून निर्यात आकडेवारी
२०१७-१८-१५ लाख ८९ हजार मैट्रिक टन-३०८८ करोड
२०१८-१९-२१ लाख ८२ हजार मैट्रिक टन-३४६७ करोड
२०१९-२०-११ लाख ४९ हजार मैट्रिक टन-२३१८ करोड
२०२०-२१-१४ लाख ०३ हजार मैट्रिक टन-२४३४ करोड (एप्रिल ते फेब्रुवारी पर्यंत)