कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:12 AM2019-08-14T01:12:19+5:302019-08-14T01:12:42+5:30

मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापाºयाने केलेल्या फसवणुकीमुळे कांदा विक्रेता शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कांदा उत्पादक आंदोलक शेतकरी समितीने मंगळवारपासून तालुक्यातील गावांमध्ये आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शुभारंभ दाभाडी येथे करण्यात आला.

 Onion farmers' agitation | कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन

कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन

googlenewsNext

मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापाºयाने केलेल्या फसवणुकीमुळे कांदा विक्रेता शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कांदा उत्पादक आंदोलक शेतकरी समितीने मंगळवारपासून तालुक्यातील गावांमध्ये आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शुभारंभ दाभाडी येथे करण्यात आला.
तालुक्यातील ६८१ शेतकºयांच्या कांदा विक्र ीचे दोन कोटी एकवीस लाख पैकी फक्त ७२ लाख रु पये दिले गेले आहेत. तसेच शेतकºयांना पूर्ण रक्कम मिळाली असा मजकूर असलेल्या पावतीवर सह्या घेऊन शेतकºयांची फसवणूक करण्यात आली आहे. या अन्यायाविरोधात जिल्हा उपनिंबधक यांना शेतकºयांचे पैसे मिळाले नाहीत असे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले़ तसेच पैसे मागणीचा फ्लेक्स बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर लावला होता. मात्र अज्ञातांनी तो रातोरात हटविला आहे. याच्या निषेधार्थ तालुक्यातील गावांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दाभाडी गावातून करण्यात आला. याप्रसंगी वामनदादा कर्डक यांच गाणं गाऊन पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली.
तसेच पैसे मागणीचा फ्लेक्स चे अनावरण करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांच्यासह झुंबरिसंग ठोके, सतीश मोरे, भगवान सोनजे आदी शेतकºयांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दशरथ बाबूराब निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पवार, काँग्रेस तालुकाध्यकक्ष डॉ.राजेंद्र ठाकरे, अनंत भोसले, सागर पाटील, अरुण आहिरे, आशिष निकम, अमोल निकम, किरण निकम, लालू केदा देवरे, पुनाजी निकम, राकेश आहिरे, नंदू गवळी, राजेंद्र पाटील, अनिल सोनवणे, बिपीन बच्छाव, प्रशांत महाजन, चेतन पवार, रवि देवरे, भगवान निकम आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title:  Onion farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.