निर्यातमूल्य हटविल्याने कांदा वधारला, मिळाला 2001 रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 06:09 PM2018-02-03T18:09:48+5:302018-02-03T18:09:54+5:30

गेल्या आठवड्यापासून कांदा भावात मोठी घसरण होत असताना कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला 2001 रुपये भाव मिळाला

Onion gets 2001 rs rate in Vinchur | निर्यातमूल्य हटविल्याने कांदा वधारला, मिळाला 2001 रुपये भाव

निर्यातमूल्य हटविल्याने कांदा वधारला, मिळाला 2001 रुपये भाव

Next

विंचूर (नाशिक) :  गेल्या आठवड्यापासून कांदा भावात मोठी घसरण होत असताना कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला 2001 रुपये भाव मिळाला. आठवडाभरापासून कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणार्या कांद्याने शुक्रवारच्या निर्यातमूल्य शुन्यावर आणण्याच्या महत्वपुर्ण निर्णयामुळे वेगाने कोसळत असलेल्या कांद्याच्या बाजार भावात वाढ झाली असून शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

कांद्याला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांना कधी नव्हे तो आर्थिक फायदा होत असल्याने शेतकर्यांमधुन आनंदाचे वातावरण असतानाच विंचूर उपबाजार आवारात 3700 चा उच्चांक गाठलेल्या कांद्याचे दर गत आठवड्यापासून झपाट्याने खाली येत होते. कांदा निम्या दरावर आल्याने या काळात देशांतर्गत बाजारात मोठी घसरण पहावयास मिळाली. त्यामुळे निर्यातमूल्य हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र काल कांदा निर्यातमूल्य तडकाफडकी पूर्णत हटविण्याचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केल्याने शनिवारी येथील उपबाजार आवारात आवक वाढुन कांदा दरात 600 रुपयांनी भाव वाढले. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे निर्यात खुली झाल्याने कांद्याचे दर स्थिर अथवा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी बाजारात कांदा विक्रीसाठी आणला होता. अपेक्षेप्रमाणे भाव वाढ झाल्याने शेतक्यांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून का होईना निर्यातमूल्य शुन्यावर आणल्य़ाने शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले जात आहे.

स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात कांद्यावरील निर्यातमुल्य दर 850 डाँलर प्रतिटन केले होते. या लादलेल्या अघोषित निर्यातबंदिमुळे मोठा फटका बसला होता. कांदा भावात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक चिंताग्रस्त झाला. मात्र कांद्यावरील निर्यातमूल्य पुर्ण रद्द झाल्याने कमी झालेल्या कांदा निर्यातीला चालणा मिळणार आहे. निर्यातमूल्य शुन्यावर आल्याने चीन, पाकिस्तान,श्रीलंका यां देशांबरोबर स्पर्धा करता येणार असून बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

शनिवारी विंचूर उपबाजार आवारात दोन सत्रात लिलाव झाले. कालच्या निर्णयामुळे भाव स्थिर राहतील किंवा वाढतील या आशेने शेतक्यांनी कांदा बाजारात आणला होता. उपबाजार आवारात 300 नगांची आवक होऊन बाजारभाव किमान1000, कमाल 2001 तर सरासरी 1750प्रतिक्विंटल राहिले. रविवारी बाजार समित्या बंद असल्याने सोमवार नंतर बाजारभाव अजुन वाढतील अशी अपेक्षा शेतकर्यांनी बोलुन दाखविली.

 निर्यातमूल्य हटविल्याने कांदयाला चांगले बाजारभाव मिळू शकेल. निर्यातीला चालना मिळणार असून, इतर देशांबरोबर स्पर्धा करता येणार असल्याने शेतकरी आर्थिकदष्ट्या सक्षम होऊ शकेल. 
- पंढरीनाथ थोरे, संचालक, लासलगाव बाजार समिती

काल सायंकाळी निर्यातमूल्य शुन्य केल्याचे समजल्याने भाव वाढतील अशी आशा होती. अपेक्षेप्रमाणे भाव वाढल्याने केंद्र शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- नवनाथ कवडे, शेतकरी, चांदवड

Web Title: Onion gets 2001 rs rate in Vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.