कांदा गडगडला, शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:22 AM2018-02-08T00:22:05+5:302018-02-08T00:23:59+5:30
लासलगाव : आवक वाढल्याने मंगळवारी लासलगावला कांद्याला किमान १०००, कमाल १,९९१ व सरासरी १,७७५ रुपये भाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सरासरी ४५० रुपयांची घसरण झाली. पुणे बाजार समितीतही कांदा गडगडला.
ठळक मुद्देबुधवारी सरासरी ४५० रुपयांची घसरण पुणे बाजार समितीतही कांदा गडगडला.
लासलगाव : आवक वाढल्याने मंगळवारी लासलगावला कांद्याला किमान १०००, कमाल १,९९१ व सरासरी १,७७५ रुपये भाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सरासरी ४५० रुपयांची घसरण झाली. पुणे बाजार समितीतही कांदा गडगडला. दोन दिवसांत किलोमागे दर १० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुधवारी दर १५ ते १८ रुपयांपर्यंत खाली आले. चांगल्या प्रतिच्या कांद्याला किलोला २० रुपयांचा भाव मिळाला.