कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 08:02 AM2023-03-27T08:02:22+5:302023-03-27T08:02:30+5:30
हिरे यांना कपात करून ५६९ रुपये ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली.
नाशिक : सटाणा बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रतिकिलो सव्वा रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्याला खिशातून पैसे घालून वाहन भाडे द्यावे लागले आहे.
ब्राह्मणगाव येथील शेतकरी सुभाष पंढरीनाथ अहिरे यांनी शुक्रवारी कांदा सटाणा बाजार समितीत विक्री केला असता व्यापाऱ्याने किलोला अवघ्या सव्वा रुपयांची बोली लावून कांदा खरेदी केला. त्यापोटी अहिरे यांना कपात करून ५६९ रुपये ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली. तेव्हा अहिरे यांना खिशातून वाहतूक भाडे १३१ रुपये द्यावे लागले.
८३३०रुपये तोटा
पाच गुंठे कांदा लागवड ते काढणी खर्च : ८००० रुपये
मिळालेले प्रत्यक्ष उत्पादन :
पाच क्विंटल दहा किलो.
वाहनात कांदा भरून विक्रीसाठी बाजार समितीत आणण्याचा खर्च : ९०० रुपये
कांद्याची काढणी केल्यापासून विक्रीपर्यंतचा खर्च : ८९०० रुपये
कांदा विक्री करून मिळालेले उत्पन्न : ५६९ रुपये ८५ पैसे
झालेला निव्वळ तोटा
: ८३३० रुपये पंधरा पैसे.