कांदा उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:15 PM2018-11-27T17:15:29+5:302018-11-27T17:17:28+5:30
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त असून राम मंदिर, आरक्षण विषयात ईतर पक्ष संघटना सहभागी असल्याने शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असून शेतकर्?यांच्या जीवनामरणाचा प्रश्न सरकारने त्वरित हाती घ्यावा आणि शेतकºयांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.
मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च केला. कांदा साठवणूक केली मात्र आठ महिने कांदा साठवून आज मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने आयात-निर्यात धोरणात सुधारणा करून शेतकºयांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतकºयांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगावला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांमधे सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने निवेदनात केली आहे.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.