नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 01:01 PM2020-09-15T13:01:15+5:302020-09-15T13:01:50+5:30
लासलगाव (नाशिक ): केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

सटाणा येथील कृषी उत्पन्न समिती गेटसमोर शंभर ते दीडशे शेतकºयांनी निर्यातबंदी तात्काळ उठवावी याबाबत घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन देण्यात आले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.सध्या कांद्याचे मार्केट सुरु झाले आहे.
लासलगाव येथे मंगळवारी सकाळी संतप्त कांदा उत्पादकांनी निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. यानंतर बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी विनंती केल्यावर बाजार समितीत विक्रीस आलेल्या कांदा वाहनातील लिलाव पुर्वव सुरू झाले.सुरवातीला पहिला कांदा लिलाव १९०० रूपये बाजार भावाने विक्री झाल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी अवघ्या पाच मिनीटात तीन वाहनाची लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच तीन हजार रूपये भावापेक्षा कमी भावाने कांदा विक्री करणार नाही तसेच कांदा निर्यातबंदी करणारे केंद्र सरकारचा धिक्कारच्या घोषणा देत लिलाव बंद पाडले.