ब्राह्मणगावी कांदा उत्पादकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:03 PM2021-04-28T21:03:52+5:302021-04-29T00:33:15+5:30
ब्राह्मणगाव : येथे बुधवारी (दि.२८) सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली.
ब्राह्मणगाव : येथे बुधवारी (दि.२८) सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली.
सध्या कांदा काढणी सर्वत्र जोरात सुरू असून त्यातच उन्हाची तीव्रता खूपच वाढत आहे. अशावेळी बुधवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजता आभाळ भरून आले. अचानक पावसाच्या सरी येऊ लागल्याने काढलेला कांदा शेतातच झाकण्यासाठी तर काहींची कांदा साठवलेल्या कूड, चाळी झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. शेतमजुरांची उपलब्धता कमी असल्याने शेतकरी धावपळ करून कांदा लवकर काढून चाळीत साठवणीच्या कामात गुंतला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता सांगितली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच धसका घेतला आहे.
(२८ ब्राह्मणगाव)
ब्राह्मणगाव येथे पावसाच्या सरी आल्याने कांदा चाळीवर प्लास्टिक कागद टाकताना शेतकरी.