येवला बाजार समितीत कांदा उत्पादकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:53+5:302021-06-24T04:11:53+5:30

गेल्या सोमवारी (दि. २१) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत ममदापूर येथील शेतकरी अक्षय गुडघे यांनी कांदा विक्री केली होती. ...

Onion growers sit in Yeola market committee | येवला बाजार समितीत कांदा उत्पादकांचा ठिय्या

येवला बाजार समितीत कांदा उत्पादकांचा ठिय्या

Next

गेल्या सोमवारी (दि. २१) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत ममदापूर येथील शेतकरी अक्षय गुडघे यांनी कांदा विक्री केली होती. व्यापारी खळ्यावर कांद्याचे रोख पैसे मागितल्याच्या कारणावरून गुडघे व व्यापारी रामेश्वर अट्टल यांचा वाद झाला. व्यापा-याकडील माणसांनी गुडघे यांना मारहाण केल्याच्या कारणावरून शहरातील मनमाड रोडवर शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला होता. यानंतर बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव कैलास व्यापारे, बाळासाहेब लोखंडे, प्रहार संघटनेचे हरिभाऊ महाजन, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी गुडघे यांच्यासमवेत चर्चा करून याप्रकरणी समझोता घडवून आणला. तर, संबंधित व्यापारी अट्टल यांनी कांद्याचे पैसेही अदा केले होते. याबरोबरच बाजार समितीने अट्टल यांना नोटीस बजावून या प्रकरणी खुलासा करण्यास सांगितले. बुधवारी, (दि. २३) महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव कैलास व्यापारे यांच्या दालनात कांदा उत्पादक शेतकरी व संघटना पदाधिका-यांनी ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलनात अक्षय गुडघे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, कोपरगाव तालुकाध्यक्ष वसंत देशमुख, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, नांदगाव युवा तालुकाध्यक्ष सोमनाथ मगर, दिगंबर धोंडगे, मुन्ना पगार, भाऊसाहेब शिंदे, युवराज वाघ आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, येवला बाजार समितीत बुधवारी (दि. २३) ९०० ट्रॅक्टर इतकी कांदा आवक झाली होती. दर किमान ७०० ते कमाल २०२१ रुपये तर सरासरी १७५० रुपयांपर्यंत होते.

इन्फो

दर घसरल्याने शेतकरी सैरभैर

कांदा लिलावात व्यापारी अट्टल सहभागी न झाल्याने कांद्याला कमी दर मिळू लागला. त्यामुळे शेतक-यांनी लिलाव बंद पाडून व्यापारी अट्टल यांच्या खळ्यावर गेले. अट्टल यांनी शेतक-यांना बाजार समितीने आपणास नोटीस बजावलेली असून बाजार समितीत आंदोलन सुरू असल्याने आपण लिलावात सहभागी झालो नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शेतक-यांनी आपला मोर्चा बाजार समिती कार्यालयाकडे वळवला. लिलावात अट्टल यांच्यासह सर्वच व्यापारी सहभागी झाले पाहिजे, अशी मागणी केली. कांदा उत्पादक संघटनेनेही लिलाव बंद होऊ नये, अशी भूमिका घेतली. बाजार समिती मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव कैलास व्यापारे, बाळासाहेब लोखंडे, प्रशासकीय सदस्य चंद्रकांत शिंदे, भानुदास जाधव, शरद शिंदे, शरद लहरे यांनी याबाबत हस्तक्षेप करून लिलाव पूर्ववत केले.

फोटो- २३ येवला फार्मर

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने येवला बाजार समितीत ठिय्या आंदोलनात सहभागी शेतकरी.

===Photopath===

230621\23nsk_30_23062021_13.jpg

===Caption===

फोटो- २३ येवला फार्मर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने येवला बाजार समितीत ठिय्या आंदोलनात सहभागी शेतकरी. 

Web Title: Onion growers sit in Yeola market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.