कांदा उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:41 PM2020-02-11T12:41:31+5:302020-02-11T12:42:34+5:30
सायखेडा : एकरी केवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच कोसळणाऱ्या भावाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सायखेडा : एकरी केवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच कोसळणाऱ्या भावाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाली आणि त्यामुळे लाल कांदा लागवडीचे क्षेत्र घटले होते. ज्या बियानात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड होईल अशी अपेक्षा होती, त्या बियानात अवघे अर्धा एकर कांदा लागवड झाली नाही. त्यामुळे कांदा लागवड घटली आहे. लागवडीनंतर कधी अधूनमधून पावसाच्या सरी तर कधी प्रचंड प्रमाणात धुके, कधी वाढती थँडी यामुळे कांदा पिकवितांना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
केवळ दोन किंवा तीनवेळा भुरशी नाशक, कीटकनाशक यांची फविरन करावी लागते अशा वेळी आठ ते दहा वेळा शेतकºयांनी औषध फवारणी करून कांदा पीक वाचविण्याचा प्रयत्न केला तरी हवा त्या प्रमाणत कांदा पिकला नाही. पर्यायाने उत्पादनात घट झाली. एकरी अवघा तीस ते चाळीस क्विंटल कांदा उत्पादन निघत आहे.
अवकाळी पाऊस आण िखराब हवामानाचा मोठा फटका कांद्यावर बसला त्यामुळे आवक घटून बाजारात विक्र ीसाठी अत्यल्प कांदा राहिल आण िपर्यायाने कांद्याला विक्र मी भाव टिकून राहील अशी अपेक्षा शेतकर्यांना होती मात्र सरकारचा हस्तक्षेप झाला आण िकधी दुसर्या देशातील खरेदी केलेला कांदा तर कधी निर्यात बंदी यामुळे कांद्याचे भाव कोसळले शेतकर्यांची घोर निराशा झाली उत्पादनात घट होऊनही कांद्या अखेर वांदा ठरत आहे
खर्चात वाढ झाली कांदा उत्पादन घटले त्यामुळे कांद्याला किमान तीन हजार रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला तर काही प्रमाणात खर्च वसूल होईल अशी परिस्थिती असतांना काद्यांचे दर कोसळले आण िकांदा पंधराशे ते सतराशे रु सरासरी विकत आहे शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे