ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादक चिंतेत मेशी : रब्बी पिकांवर रोगराईचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:45 PM2019-11-24T17:45:31+5:302019-11-24T17:46:19+5:30
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते तसेच अधूनमधून धुके आणि जास्त प्रमाणात दव पडत असल्याने बळीराजाची धाकधूक वाढत चालली आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अक्षरश: शेतांमध्ये महिनाभर पाणी साचलेले होत,े यामुळे मका, बाजरी, भुईमूग आदींसह कांदा या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातुन सावरत नाही तोवर पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.
पावसाळी कांदा पूर्णपणे पाण्यात वाया गेला असतानाच आता ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काय करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असताना आता अजून वातावरणातील बदलामुळे आताची पिकेही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत