शेकडो हेक्टरवरील कांदा करपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:41 AM2018-12-06T01:41:51+5:302018-12-06T01:42:12+5:30
पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
गोरख घुसळे।
पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
कांदा हे नगदी पीक असल्याने कांदा लागवडीकडे तालुक्यातील शेतकºयांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षी पावसाळ्याच्या चारही महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर लागवड केलेला हजारो हेक्टरवरील कांदा पाण्याअभावी जळून खाक झाला आहे. कांदा लागवडीसाठी एकरी सुमारे साठ हजार रुपये खर्च केलेला पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ज्या शेतकºयांकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे अशा शेतकºयांनी कांदा पीक जागविण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू केला आहे. मात्र वीजपुरवठा हा कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने उर्वरित पीकही पाण्याअभावी संकटात सापडले असून, शेतकरी चिंतित आहे.
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या येवला तालुक्याला दरवर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी कमी कमी होत असलेल्या पर्जन्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. असे असले तरी शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
कांदा लागवडीसाठी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. पावसाच्या दगाफटक्याने सर्वच जलस्र्रोत कोरडेठाक पडले आहेत. विहिरींना तसेच विंधनविहिरींनादेखील पाणी उतरले नाही. शेतकºयांनी रिमझिम पावसावर कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. आज ना उद्या पाऊस पडेल व विहिरींना पाणी येईल, अशी शेतकरीवर्गाला आशा होती; मात्र पावसाळ्याच्या पूर्ण हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने लागवड केलेला कांदा शेतात पूर्णपणे करपून गेला आहे. कमी पर्जन्यामुळे भूजलपातळी कमालीची खाली गेली आहे. शेकडो फूट खोल विंधनविहिरी घेऊनही पाणी उपलब्ध न झाल्याने कांदा पिकाची वाताहत झाली आहे.कांद्याचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रयेवला तालुक्यात शेतकरीवर्गाने हजारो हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली. मात्र ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कांदाक्षेत्र पाण्याअभावी करपून गेले आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी सरासरी साठ हजारांपेक्षा जास्त खर्च केला आहे. मात्र लागवड केलेला कांदा करपून गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तेलही गेले अन् तूपही गेले अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.
तालुक्यातील शेतकºयांनी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे कांदा पीक जगविण्यासाठी धावपळ केली मात्र त्यांना यश आले नाही. पावसाळ्यातही पिके जगतील अशा स्वरूपाचा पाऊस न झाल्याने संपूर्ण कांदा पीक उद्ध्वस्त झाले. शासनाने जनरेट्यामुळे उशिरा का होईना येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. शासनाने कांदा पिकाचे पंचनामे करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.