अभोण्यात कांदा आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:20+5:302021-05-07T04:15:20+5:30

आवारात तीन दिवसांत कांद्याची सुमारे २८,५०० क्विंटल आवक झाली. गत पंधरा दिवसांत कांदा दरात किरकोळ चढउतार वगळता स्थिरता ...

Onion inflow increased | अभोण्यात कांदा आवक वाढली

अभोण्यात कांदा आवक वाढली

Next

आवारात तीन दिवसांत कांद्याची सुमारे २८,५००

क्विंटल आवक झाली. गत पंधरा दिवसांत कांदा दरात किरकोळ

चढउतार वगळता स्थिरता दिसून आली.

उपबाजारात गुरुवारी (दि.६) ३७८ ट्रॅक्टर्सद्वारे सुमारे ८ हजार

क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल १५१५ रुपये, किमान २००

रुपये, तर सरासरी १०५० ते ११५० रुपये प्रति क्विंटल

दराने कांदा विकला गेला. मंगळवारी (दि.४) ४११ ट्रॅक्टर्समधून

सुमारे ९५०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी कमाल १५३० रुपये,

किमान २०० रुपये, तर सरासरी ११५० ते १२५० रुपये दर मिळाला होता.

तर बुधवारी (दि.५) ४६७ ट्रॅक्टर्सद्वारे सुमारे ११, ००० क्विंटल कांद्याची

आवक होऊन कमाल १५०० रुपये, किमान २०० रुपये तर सरासरी

११०० ते १२०० रुपये दर मिळाला होता. सध्या शहर परिसरात कांदा

काढणी, प्रतवारी करून चाळीत साठविण्याची लगबग सुरू असली

तरी गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. दुसरीकडे साठवणुकीची

सोय नसलेले शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर आपला कांदा

विक्रीसाठी आणत आहेत. उत्पादन खर्चाला फक्त शिवणारा दर सध्या

मिळत असल्याने अपेक्षित परतावा कांदा उत्पादकांच्या पदरी पडत

नसल्याचे सध्या तरी चित्र आहे.

Web Title: Onion inflow increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.