उमराणेत कांदा आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:16 IST2020-09-28T22:38:12+5:302020-09-29T01:16:34+5:30
उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ गावठी कांद्याच्या आवकेत प्रचंड ...

उमराणेत कांदा आवक वाढली
उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ गावठी कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली असुन तेराशे ते चौदाशे वाहनांमधुन सुमारे २० हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. आवक वाढल्याने सरासरी दरात दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण झाली मात्र उच्च प्रतीच्या मालाला ४५०० रु पये प्रतीक्विंटल असा दर मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या पावसामुळे चाळीत साठवणुक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा विक्र ीसाठी एकच गर्दी केली केल्याने बाजार आवाजात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याचे चित्र आहे. परिणामी आवक वाढल्याने सरासरी दरात सुमारे दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण झाली आहे.मात्र उच्च प्रतीच्या मालाला चांगला दर मिळत आहे. बाजार आवाजात सुमारे बाराशे ट्रॅक्टर, दिडशे पिकअप आदि वाहनांतून २० हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असुन बाजारभाव कमीतकमी ११०० रु पये,जास्तीत जास्त ४५०० रु पये, तर सरासरी ३१०० रु पये दराने व्यापारी बांधवांनी कांदा खरेदी केला.
@ फोटो ओळ - उमराणे बाजार समिती आवारात उन्हाळी कांद्याची झालेली प्रचंड आवक. (२८ उमराणे १)