उमराणे बाजार समितीत कांदा आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 03:18 PM2020-09-16T15:18:45+5:302020-09-16T15:22:51+5:30
उमराणे : शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने सोमवारी बाजारभावात तब्बल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली होती. त्याचा परिणाम येथील बाजार समितीतील कांदा आवकेवर झाला असुन निर्यातबंदीमुळे बाजार समितीत दररोज होणार्या कांदा आवकेपेक्षा बुधवार ( दि.१६ ) रोजी आवक घटल्याचे चित्र दिसुन आले.
उमराणे : शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने सोमवारी बाजारभावात तब्बल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली होती. त्याचा परिणाम येथील बाजार समितीतील कांदा आवकेवर झाला असुन निर्यातबंदीमुळे बाजार समितीत दररोज होणार्या कांदा आवकेपेक्षा बुधवार ( दि.१६ ) रोजी आवक घटल्याचे चित्र दिसुन आले. येथे मंगळवार ( दि.१५) रोजी झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये व लिलाव प्रक्रिया सुुुरळीत चालु राहावी यासाठी देवळा पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.यावेळी शासनाने तात्काळ निर्यातबंदी उठवावी यासंबधीचे निवेदन शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ व जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांच्यावतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, महसूल विभागाचे मंडल अधिकारी व्ही.जी.पाटील व बाजार समितीचे सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांना देण्यात आले. शासनाने अचानक अघोषीत कांदा निर्यातबंदी केल्याने चालु आठवड्यातील सोमवारी सकाळच्या सत्रात निघालेल्या ३,२०० रुपये बाजार भावाच्या तुुुलनेत दुपारनंतरच्या सत्रात कांद्याच्या दरात तब्बल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण होत २,५०० रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव खाली आले होते. परिणामी (दि.१५) रोजी शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. त्यात उमराणे येथेही आंदोलन झाले. आंदोलनानंतर पुुर्ववत लिलाव सुुरु झाल्यानंतरही बाजारभावात कुठलीही सुधारणा न झाल्याने त्याचा परिणाम बुधवार ( दि.१६ ) रोजी सकाळी आलेल्या कांदा आवकेवर दिसुुन आला असुन येथील बाजार समितीत कांदा आवकेत घट आल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे निर्यातबंदीमुळे बाजारभावात घसरण झाल्याने काल झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देवळा पोलीसांकडुन सकाळपासूनच उमराणे बाजार समिती परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान बाजार समितीत कांदा आवक घटल्याने कालच्या बाजारभावाच्या तुलनेत आज बुधवारी कांदा दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली असुन बाजारभाव कमीतकमी ९०१ रुपये, सरासरी २,४५० रुपये, तर सर्वोच्च ३,००० रुपयांपर्यंत कांद्याचे दर होते.