लासलगाव येथे कांदा @ 4950 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:14 AM2019-11-08T00:14:52+5:302019-11-08T00:15:24+5:30

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ६) कांद्याला किमान २०००, कमाल ४९५० रुपये व सरासरी ४४५१ रुपये दर मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान ११००, कमाल ३६०१ रुपये व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.

Onion at Lasalgaon @ Rs 4950 | लासलगाव येथे कांदा @ 4950 रुपये

लासलगाव येथे कांदा @ 4950 रुपये

Next

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ६) कांद्याला किमान २०००, कमाल ४९५० रुपये व सरासरी ४४५१ रुपये दर मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान ११००, कमाल ३६०१ रुपये व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.
कांदा आयात करण्याच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी आहे. पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा फटका पुढील वर्षभर जाणवणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी मिळालेल्या दराने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. रब्बीच्या लागवडीसाठी आॅक्टोबरमध्ये लावलेली रोपे वाहून गेली तर डिसेंबरमध्ये लागवड करावयाच्या खरिपाच्या कांद्यासाठी बाजारात बियाणे मिळत नसल्याने पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची पुढच्या वर्षी तीव्र टंचाई निर्माण होऊन संपूर्ण वर्षभर कांदा ग्राहकांना रडविण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात बियाणांची वानवा पाहता, त्याचेही दर गगनाला भिडल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करावयाची आहे, त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकºयांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला दर मिळून शेतकरीवर्ग आनंदित झालेला असताना त्यांच्या आनंदावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केल्यामुळे साठवलेला कांदा पावसात भिजल्यामुळे खाण्यायोग्य राहिलेला नाही. बदललेल्या हवामानामुळे कोंब फुटू लागले आहेत.वणीत कांदा दरात सुधारणावणी : दोन दिवासांपूर्वी सुमारे ४०० रु पये क्विंटलने कमी झालेल्या दरात काही अंशी वाढ झाली आहे. गुरुवारी उपबाजारात १०६ वाहनांमधून दोन हजार क्विंटल कांदा शेतकºयांनी विक्र ीसाठी उपबाजारात आणला होता. कमाल ५२९०, किमान ४००० तर सरासरी ४६७५ रु पये क्विंटल दराने उत्पादकांनी कांदा विक्र ी केली. कांद्याच्या दरात गेल्या आठवडाभरापासून चढउताराचे वातावरण आहे. थोडाफार फरक दरात सातत्याने दिसून येतो आहे. मागणी व पुरवठा याचा समन्वय सुरळीत व्यवहार प्रणालीसाठी अपेक्षित आहे.

Web Title: Onion at Lasalgaon @ Rs 4950

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.