कांद्याने केली सहा हजारी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:13 PM2019-11-09T18:13:05+5:302019-11-09T18:13:55+5:30
गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला ६०१७ रु पये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी उपबाजारात ७८ वाहनांमधून १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६०१७ किमान ४६५०, तर सरासरी ५७११ रु पये अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
वणी : गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला ६०१७ रु पये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी उपबाजारात ७८ वाहनांमधून १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६०१७ किमान ४६५०, तर सरासरी ५७११ रु पये अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. मागील आठवड्याच्या तुलनेत अनपेक्षित तेजी आली. सध्या गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढली आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या काळात त्या ठिकाणी नवीन कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, मात्र अतिवृष्टीमुळे कांदा पिकाची वाताहत झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात नवीन कांदा येण्यासाठी महिन्याचा कालावधी असल्याने तोपर्यंत कांद्याला मागणी राहील व दरातही तेजी राहील, अशी माहिती कांदा व्यापारी संजय उंबरे यांनी दिली.