येवला बाजार समितीत कांदा @ ३६१० रूपये क्विंटल : बळीराजा समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:48 PM2018-01-05T15:48:12+5:302018-01-05T15:48:32+5:30
येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे.
येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे. महाराष्ट्रालगतच्या पाच राज्यात अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पिक पुरते संपल्याने, देशाअंतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली. कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा हसला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निर्सार्गानेच केली.येवला बाजार आवारात शुक्र वारी (५ जानेवारीला) १४ हजार क्विंटल आवक झाली, त्यात ३६१० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या साठ वर्षाच्या इतिहासात आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१७ या पाच महिन्यात तब्बल एक कोटी दोन लाख ९६ हजार ७७८ क्विंटल कांद्याची आवक झाली.या सलग पाच महिन्यात कांद्याला सरासरी २८०० ते ३००० रु पये प्रतीक्विंटलभाव मिळाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोलभावाने भावाने विकला जातो व शेतकºयांच्या पदरी कायम निराशा पडते.परंतु गेल्या पाच महिन्यापासून समाधानाचे दिवस कांदा उत्पादक शेतकर्यांना निसर्गाने दिले आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत एिप्रल मध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात २ लाख ३० हजार क्विंटल आवक झाली.निरंतर आवकेत वाढच होत आहे. एिप्रलमध्ये सरासरी केवळ ३६० रूपये प्रती क्विंटल भाव तर मे मध्ये कांद्याचे ची बाजारभाव केवळ ३२५ रु पये प्रतीक्विंटल झाले.तुलनेत निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालिदल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून उठून फुफाट्यात पडला होता.परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले.नासिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यातील कांदा या चार जिल्ह्यातील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे.त्यामुळे कांद्याला आणखी काही महिने चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे.