येवल्यात कांदा बाजारभाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 08:38 PM2021-04-17T20:38:20+5:302021-04-18T00:07:31+5:30
येवला : गेल्या सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर लाल व उन्हाळ कांदा आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.
येवला : गेल्या सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर लाल व उन्हाळ कांदा आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती.
सप्ताहात एकुण कांदा आवक ५६ हजार ३४७ क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल ९७० रुपये तर सरासरी ८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १२५० तर सरासरी ९५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.
उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक २५ हजार ३१२ क्विंटल झाली असुन लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल ९५४ तर सरासरी ८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १०५० तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.