राष्ट्रवादीच्या महिलांच्या गळ्यात कांद्याची माळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:16 PM2020-09-16T23:16:23+5:302020-09-17T01:27:31+5:30
नासिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले.
नासिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्याने *राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात म्हटले आहे की, ४ जून रोजी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हे पिक वगळले होते. मात्र तीन महिन्यातच कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालून शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊन च्या अतिशय संकट काळात मोठ्या कष्टाने शेतकर्याने कांदा पिकवला होता. दोन तीन दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. तेवढ्यात केंद्र सरकारने कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी घोषित केली यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. कोरोना रोगा सारख्या महाभयंकर संकटात स्वता:च्या आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्याने लोकांसाठी भाजीपाला पिकवून शहरातील नागरिकांना अन्न धान्यांची सोय उपलब्ध करून दिली.शेतकर्याने पिकवलेला कांद्याला दोन दिवसापासून चांगला भाव मिळायला लागला तेवढ्यात कांद्यावर निर्यात बंदी घालून बळीराजाच्या तोंडातला घास केंद्र सरकारने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे भविष्यात यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील. तेव्हा केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन दिले. निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, अपेक्षा अहिरे, शहर पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, मंगला मोरे, लता चौधरी, सुजाता गाढवे, भारती चित्ते आदि महिला उपस्थित होत्या. (फोटो ल्ल२‘ वर राष्ट्रवादी)