कांदा अनुदान नव्हे हे तर जखमेवर मीठ..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:48 PM2018-12-20T17:48:29+5:302018-12-20T17:48:42+5:30
सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे आगार असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला.
सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे आगार असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. २०० रुपये अनुदान देणे म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकºयांनी व्यक्त करतांनाच या दोनशे रुपयांत उत्पादन खर्चही फिटणार नसल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे. बाजार समितीचे पदाधिकारी व कांदा व्यापाºयांनीही शेतकºयांची बाजू लावून धरली असून किमान पाचशे रुपये अनुदान जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कांदा अनुदान देण्याऐवजी सातबारा कोरा करावा अशी मागणीही शेतकºयांनी यानिमित्ताने पुन्हा केली आहे.
अवर्षणग्रस्त सिन्नर तालुका असला तरी येथे कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकºयांनी वेळप्रसंगी टॅँकरने पाणी भरुन कांद्याचे पीक वाचविले. तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकºयांनी कांद्याचे पीक सांभाळले. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कांद्याला मातीमोल भाव मिळाला. जिल्ह्यात शेतकºयांनी अनेक ठिकाणी कांदाफेक आंदोलन केले. रस्त्यावर कांदा फेकून शेतकºयांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली होती.