फेब्रुवारीतही कांदा लागवड सुरूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:02 PM2020-02-08T13:02:36+5:302020-02-08T13:03:20+5:30
पाटोदा :- फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु होतो मात्र यंदा गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात कांदा पिकाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा झाल्यामुळे शेतकर्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असून कांदा लागवडीला वेग आलेला आहे.
पाटोदा :- फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु होतो मात्र यंदा गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात कांदा पिकाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा झाल्यामुळे शेतकर्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असून कांदा लागवडीला वेग आलेला आहे. फेब्रुवारी मिहन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी येवला तालुक्यात कांदा लागवड सुरूच आहे.तालुक्यात यंदा विक्र मी २१ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर कांदा लागवड झाली असून अजून पंधरा दिवस हि कांदा लागवड सुरूच राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कांदा लागवड क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढणार आहे. कांदा लागवडी साठी शेतकरी वर्गाने एकरी साठ ते पासष्ट हजार रु पये खर्च केले आहे. आगामी काळात कांदा उत्पादन जास्त तर मागणीत घट येणार असल्याने दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ कांद्याची लागवड आॅक्टोबर नोव्हेंबर जास्तीत जास्त डिसेंबर मिहन्यापर्यंत केली जाते मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रांगडा व उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुबार रोपे टाकत शेतात कांदा लागवडीला प्राधान्य दिले आहे. सध्या कांदा रोपाचा भाव गगनाला भिडला असून एकरी चाळीस हजार रपये प्रमाणे रोपे उपलब्ध करीत शेतकरी कांदा लागवड करीत असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.