चाळीतील कांदा भाव खाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:23 PM2018-06-25T14:23:55+5:302018-06-25T14:24:08+5:30

येवला : राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

The onion price of chawal will eat | चाळीतील कांदा भाव खाणार

चाळीतील कांदा भाव खाणार

Next

येवला : राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. इतर राज्यांतून मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या दहा ते बारा दिवसापासून कांदादरात दररोज सुधारणा होत आहे.शेतकरी चाळीत असलेला कांदा पाहून आनंदी होत आहे. उन्हाळ कांदा तारणार असल्याचे चित्र दिसत आहे.गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याला भाव मिळाला त्याची पुनारारु त्ती होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सप्ताहात शुक्र वारि कांद्यास सरासरी १०५१ रु पये भाव मिळाला.सोमवारी तुलनेत १०० रु पयांनी वाढ होऊन, तो सरासरी ११५० रु पये प्रति क्विंटल, तर कमाल दर १२५२ रु पयांपर्यंत पोहचल्याने बळीराजाची कळी फुलणार असल्याचा आशावाद निर्माण झाला आहे.यापुढे काही दिवस तरी कांदा दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे जाणकार सांगत आहे.येवला बाजार समतिीत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कांदा दरात अल्पशी वाढ सुरु आहे.दररोज ५० ते १०० रु पयांची वाढ होत असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास सुरु वात झाली आहे.कांद्याने हजारावर गेल्याने शेतकर्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
======================================
गेल्या सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर ऊन्हाळ कांद्याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसले.कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापुर इ. ठिकाणी मागणी चांगली होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ३३२४० क्विंटल झाली असुन ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते १२५२ रूपये तर सरासरी १०५० रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच अंदरसुल उपबाजार येथे कांद्याची एकुण आवक ३३६९६ क्विंटल झाली असून ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते १२३७ रूपये भाव तर सरासरी हजार रूपये प्रति क्विंटल पर्यंत भाव होते.

Web Title: The onion price of chawal will eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक