देशावर मागणी वाढल्याने कांदा दरात अडीचशे रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 01:32 AM2022-02-11T01:32:51+5:302022-02-11T01:33:09+5:30
देशावर कांदा मागणी वाढल्याने लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सुमारे अडीचशे रुपयांची वाढ होऊन सर्वाधिक भाव २९५६ तर सरासरी २६४० रुपये कांदा भाव जाहीर झाला.
लासलगाव : देशावर कांदा मागणी वाढल्याने लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सुमारे अडीचशे रुपयांची वाढ होऊन सर्वाधिक भाव २९५६ तर सरासरी २६४० रुपये कांदा भाव जाहीर झाला.
गुरुवारी (दि.१०) लासलगाव बाजारपेठेत १२६३ वाहनातील १८८२५ क्विंटल लाल कांदा किमान १००० ते २९५६ व सरासरी २६४० रुपये भाव जाहीर झाला तर बुधवारी (दि.९) १३५० वाहनातील २०११८ क्विंटल लाल कांदा किमान ८०० ते २७११ व सरासरी २३५१ रुपये भाव होता, त्यामुळे किमान भावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.
गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,२२२,१६० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६०० कमाल रुपये २,६६१ तर सर्वसाधारण रुपये २,१३३ प्रती क्विंटल राहिले. (१० ओनियन लासलगाव, १)