येवल्यात कांद्याला १६९१ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:53+5:302021-05-25T04:15:53+5:30

येवला : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा लिलाव सुरळीत पार पडले. ५०० ट्रॅक्टरमधून सुमारे नऊ हजार क्विंटल कांद्याची ...

Onion price in Yeola is Rs. 1691 | येवल्यात कांद्याला १६९१ रुपये भाव

येवल्यात कांद्याला १६९१ रुपये भाव

Next

येवला : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा लिलाव सुरळीत पार पडले. ५०० ट्रॅक्टरमधून सुमारे नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. बाजारभाव किमान ५०० ते कमाल १ हजार ६९१ रुपये तर सरासरी १ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

कोरोनाविषयक कठोर निर्बंधांमुळे बंद असणारी येवला बाजार समिती निर्बंध शिथील झाल्यानंतर सोमवार (दि. २४)पासून सुरू झाली. बाजार समितीने शेतमाल विक्रीसाठी पूर्वनोंदणी आवश्यक केली होती. त्यामुळे पहाटेपासूनच बाजार समितीजवळ महामार्गावर दुतर्फा ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या होत्या. बाजार समितीचे कर्मचारी तपासणी करूनच वाहने आत सोडत होते. ज्या शेतकरी, वाहनचालकांकडे कोरोना चाचणी प्रमाणपत्र नव्हते, त्यांच्या तपासणीची सोय आरोग्य विभागाच्या सहकार्याने बाजार समितीत करण्यात आली होती. यावेळी १९४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

सकाळी ९.३० वाजता प्रत्यक्ष लिलावाला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत लिलाव पूर्ण झाले. या दरम्यान कुठल्याही प्रकारची तक्रार वा वाद झाले नाहीत. यावेळी मुख्य प्रशासक वसंत पवार, बाळासाहेब लोखंडे, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सचिव कैलास व्यापारे आणि सहकारी उपस्थित होते.

फोटो- २४ येवला ओनियन १/२/३

===Photopath===

240521\24nsk_18_24052021_13.jpg~240521\24nsk_19_24052021_13.jpg~240521\24nsk_20_24052021_13.jpg

===Caption===

फोटो- २४ येवला ओनियन~फोटो- २४ येवला ओनियन १/२/३~फोटो- २४ येवला ओनियन १/२/३

Web Title: Onion price in Yeola is Rs. 1691

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.