किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जास्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:58 PM2017-09-19T23:58:02+5:302017-09-20T00:04:31+5:30
नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.

जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर गेल्या आठवड्यात तीन दिवस कांदा लिलाव बंद राहिल्याने कांदा उत्पादकांसमोर साठवणुकीचा माल विक्रीची समस्या निर्माण झाली होती. परंतु, जिल्हाधिकाºयांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारपासून बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र, काही बाजारांमध्ये व्यापाºयांनी लिलावांमध्ये अल्प प्रमाणात सहभाग घेतल्याने कांद्याचे दर घसरले असून, सरासरी अकराशे ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याचे लिलाव झाले. बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही किरकोळ बाजारात कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. कांद्याच्या भावामध्ये एवढी वाढ केवळ मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे होत असल्याचा आरोप किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी केला आहे. सध्या लिलावात चौदाशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा विकला जात असला तरी मध्यस्थांकडून कांदा किरकोळ व्यापाºयांपर्यंत येईपर्यंत १७ ते १९ रुपयांपर्यंत पडतो. त्यामुळे ग्राहकांना १८ ते २० रुपयांपर्यंत कांद्याची विक्री करावी लागते.
-अनूप जैन,
किरकोळ भाजीविक्रेता कांद्याचे भाव अधिक होते तेव्हा कांदा घेताना विचार करावा लागत होता. परंतु आता कांद्याचे भाव घसरले असले तरी किरकोळ खरेदी करताना किलोमागे २० ते २२ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांना दिलासा मिळत नसेल तर सरकारने मध्यस्थांवर योग्य कारवाई करून यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.
-साधना जोशी, गृहिणी, नाशिक