आवक वाढल्याने कांद्याचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:48 AM2018-02-17T01:48:15+5:302018-02-17T01:48:26+5:30
कांद्याची आवक वाढत चालल्याने सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या महिन्यात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्र ी होणाºया कांद्याला बाजार समितीत १६ ते २० रुपये किलो असा बाजारभाव मिळत आहे.
पंचवटी : कांद्याची आवक वाढत चालल्याने सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या महिन्यात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्र ी होणाºया कांद्याला बाजार समितीत १६ ते २० रुपये किलो असा बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात तसेच हातगाडीवर कांदा कमीतकमी ३० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांना सध्या तरी जादा दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला होता. परिणामी कांद्याचे बाजारभाव वाढले होते. सध्या बाजार समितीत कांदा विक्रीसाठी दाखल होत असून, १६०० ते २००० रुपये क्ंिवटल असा बाजारभाव कांदा उत्पादक शेतकºयांना मिळत आहे. आगामी एप्रिल तसेच मे महिन्यात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. कांद्याला मागणी असली तरी सध्या १६ ते २० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत असून, कांद्याचे बाजारभाव काही दिवसांपासून स्थिर आहेत, असे कांदा व्यापारी रुची कुंभारकर यांनी सांगितले.