कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:37 AM2018-12-01T01:37:50+5:302018-12-01T01:38:10+5:30

लासलगाव : कांद्याचे भाव वाढले की शहरी भागातील लोक मेटाकुटीला येतात आणि भाव कमी झाले की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे ...

 Onion prices are three rupees | कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव

कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव

Next

लासलगाव : कांद्याचे भाव वाढले की शहरी भागातील लोक मेटाकुटीला येतात आणि भाव कमी झाले की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे डोळे पाणावतात. हे विषम चित्र बदलण्याचे नाव घेत नाही. आशिया खंडातील प्रथम क्र माकांची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शुक्रवारी (दि. ३०) कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दररोज उन्हाळी आणि लाल कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून, शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यानेही शेतकºयांना साथ दिलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी लिलावाप्रसंगी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा ३, तर लाल कांदा अवघा ११ रु पये किलो भावाने विक्री झाला आहे.
परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याचे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. उन्हाळ कांदा हा आॅक्टोबर महिन्यात संपुष्टात येतो, मात्र उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत येत आहे. हा कांदा सात ते आठ महिने जुना साठवलेला असल्याने या कांद्याच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याला किलोला एक ते तीन रु पये बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बळीराजा हतबल
कांदा पीक घेत असताना शेतकºयांचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून, या पिकाला शाश्वत दर मिळत नाही. कांदा लागवडीपासून ते खुरपणी, औषध फवारणी, रासायनिक खते देणे, पाणी देणे, त्यातच दिवसा लोडशेडिंग असेल तर रात्रीच्या वेळी पाणी देणे आणि विक्र ीसाठी कांदा बाजारात आणणे, यासाठी हजारो रु पये खर्च येतो. मात्र, तेवढाही खर्च सध्याच्या कांदा बाजारभावामुळे निघत नसल्याने आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्यात, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title:  Onion prices are three rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.