कांदा दरात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 04:07 PM2020-02-05T16:07:08+5:302020-02-05T16:07:19+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.बुधवारी कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला.
लासलगाव : येथील बाजार समितीत आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.बुधवारी कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. बुुुधवारी मंंगळवारच्या तुलनेत सर्वाधिक ,कमीत कमी व सरासरी भावात २०० रूपयांची घसरण होत दुपारपर्यंत १०१८ वाहनातील १४०२० क्विंटल कांदा किमान ७०० ते कमाल १९०५ व सरासरी १६०० रूपये भावाने विक्र ी झाला होता. लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी २०१८ वाहनातील लाल कांदा किमान ९०० ते कमाल २१५२ व सरासरी १८०० रूपये भावाने विक्र ी झाला होता. बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल अर्ली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर, २०१९ पासुन संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या बाणज्यि व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर, २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणा-या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला असुन ग्राहक व्यवहार, अन्न आण िसार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापा-यांना २५० क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापा-यांना २५ क्विंटलपर्यंत (०.५ मे. टन) साठवणुकीची मर्यादा लागु केल्याने येथील व्यापारी वर्गास मोकळ्या स्वरूपातील कांदा खरेदीमुळे त्यांच्या दैनंदीन कांदा खरेदीवर बंधन आलेले आहे.