कांदा दरात घसरण सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:29 PM2020-06-22T22:29:23+5:302020-06-22T22:53:00+5:30
ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.
खरिपाची तयारी करतांना शेतकऱ्यांना सद्या आर्थिक अडचण पाहता शेतकऱ्यांकडे सद्या विक्र ीसाठी चाळीत साठवलेला कांदा हे एकमेव साधन आहे. त्यात दोन पैसे जास्त भेटले तर खरीप हंगाम साठी भांडवल उपलब्ध होईल.मात्र शेतकºयांनी बाजारात विक्र ीसाठी नेलेला कांदा अगदीच कमी भावात विकावा लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
सद्या शेतकºयांना बँकांनीही कर्ज देण्यास हात आखडता घेतला आहे.जिल्हा बँकेची परिस्थिती, सहकारी संस्था यांची परिस्थिती बिकट आहे तर राष्ट्रीय कृत बँक शेती कर्ज देण्यास नकार देतात. तेव्हा शेतकºयांना आर्थिक भांडवलाची आवश्यकता पाहता सद्या तरी कांदा हे हमी पीक आहे. मात्र हेच हातचे साधन मातीमोल भावाने विकून हाती येणाºया पैशात शेतात बी बियाणे,खते, व अन्य व्यवस्था कशी करावी या विवचनेत शेतकरी सापडला आहे. शासनाने यात हस्तक्षेप करून कांद्याला चांगला भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यातच एवढी महागडी औषधे, बियाणे, खते, डिझेलचे वाढते भाव पेरणी करून ही पावसाने परिसरात घेतलेली विश्रांती पाहता पीक व उत्पन्न हाती कसे येईल या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कोरोनाचा फटका गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच कांद्याचीही मागणी घटली तसेच बाजारभावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतीत आहे.