कांदा दरात १०० रूपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:29 PM2020-02-12T13:29:59+5:302020-02-12T13:30:07+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांदा आवक कमी झाल्याने २२०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी सकाळी ७३७ वाहनातील कांदा लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रूपये तर सरासरी १९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रूपयांच्या तुलेनत आज १०० रूपयांची घसरण झाली.

केंद्र शासनाने फक्त आंध्रप्रदेशमधील कृष्णपुरम या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिलेली असुन दि. ३१ मार्च, २०२० पर्यंत १० हजार मे. टन कांदा पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे केंद्राने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्यावतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे. गुरूवारी सायंकाळी इमेल करून केंद्रीय सरकारचे विविध मंत्री व अधिकारी यांच्याकडे ही मागणी जगताप यांनी व्यक्त केली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक सुरू झालेली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक मधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झालेला असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तांतडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे.