अभोण्यात कांदा दरात ७०० रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:37 AM2020-11-13T00:37:00+5:302020-11-13T00:37:26+5:30
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात तीन दिवसांत कांद्याची आवक वाढून सुमारे १५ हजार ६०५ क्विंटल आवक झाली. दरात ७०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात तीन दिवसांत कांद्याची आवक वाढून सुमारे १५ हजार ६०५ क्विंटल आवक झाली. दरात ७०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दीपावलीनिमित्त दि.१२ ते दि.२१ पर्यंत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहेत, अशी माहिती सचिव रवींद्र हिरे ,रवींद्र पवार यांनी दिली. उपबाजारात सोमवारी (दि.९) ४०७ ट्रॅक्टर्सद्वारे सुमारे ५८३० क्टिंटल कांद्याची आवक होऊन सुपर कांदा ५,३०० रुपय ते ६,५०० रुपये, खाद कांदा १,७००ते ३,२६५रुपये प्रति क्विंटलने विकला गेला.
मंगळवारी (दि.१०) ५२४ ट्रॅक्टर्सद्वारे सुमारे ५,७२५ क्टिंटल कांद्याची आवक झाली. सुपर कांदा ४,८०० ते ५,५०० रुपये, खाद कांदा ९०० ते ३,१०० रुपये प्रति क्विंटलने विकला गेला, तर बुधवारी(दि.११) ३९७ ट्रॅक्टर्सद्वारे ४०५० क्विंटल कांद्याची आवक झाली. सुपर कांदा ४,६०० रुपये ते ५,३०५ रुपये, खाद कांदा ८०० ते २,८६० रुपये प्रति क्विंटल भाव राहिले. मात्र सोमवार मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ७०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.