कांदा भावात ६५० रूपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 02:31 PM2019-09-26T14:31:08+5:302019-09-26T14:31:45+5:30

लासलगाव : दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक वाढल्याने तसेच इजिप्तचा कांदा देखील भारतीय व्यापारी बाजारपेठेत लवकरच आणत असल्याचा एकूण परिणामामुळे जिल्ह्यात बाजारपेठेतील कांदा भावात एकाच दिवसात सहाशे पन्नास रूपयांची घसरण झाली.

Onion prices fell by Rs | कांदा भावात ६५० रूपयांची घसरण

कांदा भावात ६५० रूपयांची घसरण

Next

लासलगाव : दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक वाढल्याने तसेच इजिप्तचा कांदा देखील भारतीय व्यापारी बाजारपेठेत लवकरच आणत असल्याचा एकूण परिणामामुळे जिल्ह्यात बाजारपेठेतील कांदा भावात एकाच दिवसात सहाशे पन्नास रूपयांची घसरण झाली. सर्वाधिक भाव ३५०० रूपये जाहीर करण्यात आल्याने कांदा उत्पादकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी सकाळी ४३९ वाहनातुन कांदा आवक बाजारपेठेत झाली. मात्र नाफेडचा कांदा शहरी भागात पोहचला.तसेच दक्षिणेकडील सर्वच कांदा बाजारपेठेत तेथिल कांदा आवक वाढली आहे त्याचाच परिणाम आता नाशिक जिल्ह्यात बाजारपेठेत असलेला तेथील मागणीचा जोर घसरला आहे त्यामुळे एकाच दिवसात सहाशे पन्नास रूपये घसरण होत किमान १५०१ ते ३५९९ व सरासरी ३२०१ रूपये भाव जाहीर झाला.तसेच सरासरी भावात चारशे पन्नास रूपयांची घसरण झाली त्यामुळे चिंता वाढली आहे. मंगळवारी दि.२४ सप्टेंबर रोजी लासलगाव येथे ६९४ वाहनातील कांदा १००० ते ४१७९ रूपये व सरासरी ३६५१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.तर मागील सप्ताहाच्या तुलनेत सोळाशे रूपयांची कमाल भावात घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीत आज गुरूवारी सकाळी या हंगामातील विक्र मी ५१०० रूपये प्रतिक्विंटल कांदा भाव जाहीर झाला. या हंगामात हा सर्वाधिक भाव दि.१९ सप्टेंबर रोजी जाहीर होता.

Web Title: Onion prices fell by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक