कांदा भावात २०० रूपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:47 PM2018-02-16T12:47:34+5:302018-02-16T12:47:56+5:30

लासलगांव -चालू हंगामात प्रथमच उन्हाळा कांद्याचे आगमन झाले असुन निर्यातमूल्य शून्य केल्यानंतरही येथील लिलावात बुधवारच्या तुलनेत शुक्र वारी सकाळ सत्रात लिलाव सुरू होताच दोनशे रूपयांची वेगाने घसरण झाली आहे.

Onion prices fell by Rs 200 | कांदा भावात २०० रूपयांची घसरण

कांदा भावात २०० रूपयांची घसरण

googlenewsNext

लासलगांव -चालू हंगामात प्रथमच उन्हाळा कांद्याचे आगमन झाले असुन निर्यातमूल्य शून्य केल्यानंतरही येथील लिलावात बुधवारच्या तुलनेत शुक्र वारी सकाळ सत्रात लिलाव सुरू होताच दोनशे रूपयांची वेगाने घसरण झाली आहे. भाव पुर्वपदावर आले.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या नाराजीत भर पडली आहे. बुधवारच्या तुलनेत शुक्र वारी किमान भावात ४०० तर कमाल भावात २०० रूपये व सरासरी भावात १०० रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली. बाजार समितित बुधवारी लाल कांदा आवक ६५० वाहने झाली होती व भाव किमान १०००, कमाल १९०७, सरासरी १७५० रूपये होते.तर शुक्र वारी कांदा आवक एक हजार वाहनातून झाली असून लाल कांदा किमान भाव ६०० कमाल भाव १७६१, सरासरी भाव १५५० रूपये तर उन्हाळ कांदा किमान ८००, कमाल १७६१, सरासरी १४५० भाव क्विंटल जाहीर झाले.

Web Title: Onion prices fell by Rs 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक