कांदा भाववाढीचा केंद्राने मागविला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:18 AM2017-09-08T01:18:33+5:302017-09-08T01:18:46+5:30
गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.
नाशिक : गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातच केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या उपसचिवांच्या पथकाने नाशिकला भेट देऊन कांद्याच्या बाजारपेठेची माहिती करून घेतली. बाजार समित्यांमध्ये दररोज होणारी कांद्याची आवक, लिलावाचे ठरणारे दर व व्यापाºयांकडून विक्रीसाठी पाठविल्या जाणाºया कांद्याचे प्रमाण याची माहितीही या पथकाने घेतली तसेच लिलावाची रक्कम शेतकºयांना मिळते की, व्यापारी कृत्रिमरीत्या दर वाढवतात, याचीही खात्री या पथकाने केली त्यासाठी थेट शेतकºयांशी संवाद साधला होता. या समितीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला असला तरी, सरकारचे बहुधा त्यातून समाधान झालेले नाही. दुसरीकडे उन्हाळ कांद्याचे लिलाव अद्यापही तेजीतच आहेत. साधारणत: २२०० ते २५०० रुपये क्विंटल कांद्याचे दर असून, पावसाळी कांद्याची मोठी आवक झाल्याशिवाय कांदा तेजीतच राहणार आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. कांद्याचा लिलाव २५०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी, खुल्या बाजारात तो ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे व आणखी काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याने केंद्र सरकार धास्तावले आहे. त्यासाठी कृषी खात्याने पुन्हा कांद्याचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिवांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून कांद्याची सद्यस्थिती जाणून घेतली. गेल्या महिन्यात जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये किती कांद्याची आवक झाली व त्यापैकी किती कांदा देशांतर्गत पाठविला गेला याची माहिती देण्याची, तसेच कांद्याला मिळणाºया दरामागची कारणमीमांसा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या मते शेतकºयांकडून कांद्याची खरेदी करून व्यापारी साठेबाजी करीत असल्यामुळेच कांद्याचे दर वाढल्याचा अंदाज आहे म्हणूनच व्यापाºयांकडे असलेल्या साठ्याचीही माहिती मागविण्यात आली आहे.