आवक घटल्याने कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 09:34 PM2021-01-20T21:34:56+5:302021-01-21T00:56:07+5:30
पिंपळगाव बसवंत : केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवल्यावर कांद्याच्या आवकेत मोठी घट होत असल्याने पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी(दि.२०) लाल कांद्यास ३४०० तर उन्हाळ कांद्यास ३०५० रूपये प्रति किंटल दर मिळाला. दिवसेंदिवस कांदा आवकेत घट होत असून कांद्याच्या बाजार भावात वाढ होताना दिसत आहे.

१४ सप्टेंबर रोजी कांदा निर्यात बंदी केल्यानंतर उन्हाळ कांद्याचे दर सहा हजार पार झाले होते मात्र लाल कांदा बाजारात आल्यावर उन्हाळ कांद्याच्या दरात मोठी तफावत दिसून आली. त्यानंतर १ जानेवारी नंतर शासनाने बंदी उठवल्यावर पुन्हा कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षाअखेर लाल कांद्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ होऊन हा कांदा जास्तीत जास्त २८९९ रुपये प्रति क्विंटल तर उन्हाळ कांद्याचा दरात ३०० रुपयांची वाढ होऊन हा कांदा २४७० रुपये प्रति क्विंटल दरात स्थिर राहिला . मात्र सध्या आवकेत घट होत असल्याने लाल व उन्हाळ कांद्याने ३ हजार रुपये किंटल दर पार केले आहेत. मंगळवारी (दि.१९) लाल कांद्याला जास्तीत जास्त ३३०० किंटल दर मिळाला होता तर बुधवारी ३४५१ दर मिळाला. दिवसेंदिवस आवकेत घट होऊन कांद्याचे दर वाढत असल्याने कांदा पुन्हा एकदा उसळी मारणार, असे मानले जात आहे.
.