कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:52 PM2019-02-25T18:52:02+5:302019-02-25T18:52:14+5:30

वणी : परराज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित स्पर्धात्मक दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदल झाले आहेत. वणी उपबाजारात सोमवारी सातहजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ३३८ वाहंनामधुन सातहजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता. कमाल ५७५ रूपये प्रती क्विंटल किमान २०० तर सरासरी ३५० रु पये प्रती क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.

Onion Rates Falling | कांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

Next
ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे मागणीत घट

वणी : परराज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित स्पर्धात्मक दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदल झाले आहेत.
वणी उपबाजारात सोमवारी सातहजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ३३८ वाहंनामधुन सातहजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता. कमाल ५७५ रूपये प्रती क्विंटल किमान २०० तर सरासरी ३५० रु पये प्रती क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.
गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांबरोबर महाराष्ट्रात ही लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे मागणी नाही याचा परिणाम दर घसरणीवर झाला आहे.
लाल कांद्याची टिकवण क्षमता आठ ते दहा दिवसांची असते त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा विक्र ी उत्पादकांना करावी लागते आहे. व्यापारी वर्ग ही कांदा साठवणुकीच्या निर्णय प्रक्रि येत नाही, कारण मागणी नसली व साठवणुक केलेला कांदा खराब झाला तर काय करायचे ? या भीतीमुळे व्यापारीवर्गाने कांदा खरेदी बाबतीत सावध पवित्रा घेतला आहे.
याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आंतर राष्ट्रीय स्तरावर होत असल्याची माहीती निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. दरम्यान एप्रील महीन्यात कांदा दराबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असुन उत्पादक व व्यापारी यांची प्रतिक्षा करण्याव्यतीरिक्त पर्याय राहीला नाही. (फोटो २५ कांदा)

Web Title: Onion Rates Falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा