कांद्याचे दर गृहिणींच्या आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:30 PM2020-02-29T23:30:18+5:302020-02-29T23:30:53+5:30
नाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दररोज चढउतार होत असली तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या प्रतिनुसार ग्राहकांकडून दर आकारले जात असले तरी सध्या कांदा खरेदी गृहिणींच्या आवाक्यात आली आहे. दरम्यान, हायब्रीड कोथिंबिरीला गुजराथमध्ये मागणी वाढल्याने कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून, गत सप्ताहाच्या तुलनेत फ्लॉवरच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. कोबी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल दराने माल विक्री करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मागील काही सप्ताहापासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. किरकोळ बाजारातही कांदा दरात थोड्याफार प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात ३० ते १२ रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री होत आहे. कांद्याची प्रत पाहून ग्राहक खरेदी करताना दिसतात.
कोबी फ्लॉवरच्या दर मागील सप्ताहात खूपच घसरण झाली होती. कोबीच्या भावात अद्याप काही सुधारणा झाली नसली तरी फ्लॉवरच्या दरात थोड्याफार प्रमाणात सुधारणा झाली आहे. सध्या फ्लॉवर ५०० ते १००० रुपये क्ंिवटल, तर कोबी ३०० ते ५५० रुपये क्विंटलने विकला जात आहे. किरकोळ बाजारात फ्लॉवर १० ते २० रुपये नगाप्रमाणे विकला जात आहे. फळभाज्यांमध्ये काकडी, कारले यांना चांगली मागणी आहे. काकडीला ८०० ते २००० रुपये क्विंटल, तर कारल्याला २००० ते ३७५० रुपये क्विंटल दर मिळत आहे. टमाट्याची आवक आणि भाव स्थिर आहेत. टमाट्याला ३०० ते ७०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. महाराष्टÑात शेकड्याने विकली जाणारी कोथिंबीर गुजराथमध्ये किलोने विकली जाते. सध्या गुजराथमधून हायब्रीड कोथिंबीरला चांगली मागणी आहे. यामुळे नाशिक बाजार समितीत कोथिंबीरच्या दरात सुधारणा झाली असून, सध्या ही कोथिंबीर १८०० ते ४२०० रुपये शेकडा या दराने विकली जात आहे. महाराष्टÑात गावठी कोथिंबीरला मागणी असली तरी गावठी कोथिंबीरची आवक कमी झाल्याने सध्या या कोथिंबीरलाही चांगला दर मिळत आहे.