कांदा आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 02:31 PM2019-10-12T14:31:07+5:302019-10-12T14:31:16+5:30

वणी : उत्पादकांकडील साठवणुक केलेला कांदा हा मर्यादीत स्थितीपर्यंत पोहचल्याने कांदा आवकेत घसरण सुरु झाली आहे.

Onion reduction | कांदा आवकेत घट

कांदा आवकेत घट

Next

वणी : उत्पादकांकडील साठवणुक केलेला कांदा हा मर्यादीत स्थितीपर्यंत पोहचल्याने कांदा आवकेत घसरण सुरु झाली आहे. मागणी असूनही अपेक्षित कांदा विक्र ीसाठी येत नसल्याने दरवाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उपबाजारात ४७ वाहनांमधुन अवघा एक हजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता. मागील आठवड्यात चार ते पाच हजार क्विंटल आवक काही दिवसात झाली होती. त्या तुलनेत शनिवारी आवकेत कमालीची घसरण झाली. अवघा एक हजार क्विंटल कांदा विक्र ीसाठी आल्याने कांदा खरेदीसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले होते. कमाल तीन हजार रु पये किमान २१०० तर सरासरी २७१० रूपये क्विंटल दराने कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. साठवणुक केलेला कांदा संपण्याच्या मार्गावर असल्याने कांद्याचे दर भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Onion reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक