धुक्यामुळे कांदा पिक उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:19 PM2020-01-08T13:19:00+5:302020-01-08T13:19:08+5:30
येवला : आवक स्थिर असूनही कांद्याच्या दारात घसरण होत असल्याने शेतकरी हा दर पदरात पाडून घेण्यासाठी कांदा विक्र ीला पसंती देत आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उध्वस्त करण्याचे काम केले.
येवला : आवक स्थिर असूनही कांद्याच्या दारात घसरण होत असल्याने शेतकरी हा दर पदरात पाडून घेण्यासाठी कांदा विक्र ीला पसंती देत आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उध्वस्त करण्याचे काम केले. या धुक्याने कांद्याची पात वाकडी होउन कांद्याची वाढ खुंटली. काही रोगांचाही प्रादुर्भाव या कांद्यावर झाला. त्यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतशिवारात शेतकरी बोलत आहे.
गत सप्ताहात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाली. बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. धुक्याने रोपांनाही फटका दिला आहे. मात्र या संकटातूनही शेतकरी सावरत उन्हाळ कांदा लागवडीकडे वळला आहे. यंदाचे कांद्याचे विक्र मी भाव पाहता व पाण्याची उपलब्धता लक्षात घेउन बहुसंख्य शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. कोणतेही संकट आले तरी त्यावर मात करीत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४५ हजार १७७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान एक हजार, कमाल ५४५१ तर सरासरी ३८०० रु पये प्रति क्विंटलपर्यंत होते. अंदरसूल उपबाजारात कांद्याची एकूण आवक १३ हजार ८० क्विंटल झाली आहे. कांद्याचे बाजारभाव किमान एक हजार, कमाल पाच हजार तर सरासरी ३६०० रु पये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर आज बाजार समितीत ८०० ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. मात्र बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कमी होत आहेत. आज बाजारभाव किमान १ हजार ५०० रु पये, कमाल ४ हजार ३६१ रु पये, तर सरासरी बाजारभाव ३ हजार ८०० रु पये होते.
सप्ताहात गहू व बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात गव्हाची एकूण आवक १७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९२६, कमाल २५०० तर सरासरी २१०० रु पयांपर्यंत होते. बाजरीची एकूण आवक ४४ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १७१८, कमाल १८९५ तर सरासरी १७५० रु पयांपर्यंत होते.
सप्ताहात सोयाबीन टिकून होती तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयबीनची एकूण आवक ७८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ४१५१, कमाल ४३६८ तर सरासरी ४२०० रु पयांपर्यंत होते.
मक्याच्या बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. सप्ताहात मक्याची एकूण आवक २१ हजार ११९ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १७६०, कमाल १९७० तर सरासरी १८५० रु पये प्रती क्विंटल पर्यंत होते.