पावसाच्या भीतीमुळे कांदा विक्रीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:41 PM2019-11-04T14:41:14+5:302019-11-04T14:41:30+5:30
वणी : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज व अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तसेच कांदा दरातील तेजीची स्थिती पाहुन उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी अग्रक्र म दिला.
वणी : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज व अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तसेच कांदा दरातील तेजीची स्थिती पाहुन उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी अग्रक्र म दिला. सोमवारी येथील उपबाजार आवारात चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. १७४ वाहनामधुन चार हजार कांदा विक्र ीसाठी उपबाजारात उत्पादकांनी आणला होता. ५८९१ कमाल, ४८०० किमान तर ५३०० रु पये प्रति क्विंटल सरासरी अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. कांदा चाळीतील साठवणुक केलेला कांदा उत्पादक विक्र ीसाठी बाहेर काढतात तेव्हा त्यांना याची प्रतवारी आकारमानानुसार करावी लागते. त्यावेळी काही लहानस्वरु पाचा कांदा बाजुला करावा लागतो. गोल्टी स्वरु पाच्या या कांद्याला दर कमी मिळतो त्यावेळी अप्रत्यक्ष नुकसान शेतकºयांचे होते. दरम्यान, सध्या बेमोसमी पावसाचा धडाका सुरु आह. अचानकपणे जोरदार पर्जन्यवृष्टी होते. पिकांचे नुकसान होते. त्यात हवामान खात्याच्या अंदाजामुळे पुन्हा शेतकºयांचा जीव टांगणीला लागलेला आहे. कारण अशा स्थितीत कांदा पावसाने भिजुन खराब झाला तर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी भिती उत्पादकांच्या मनात असल्याने कांदा विक्रीच्या व्यवहार प्रणालीला गती आली आहे.