सटाण्यात कांदा गडगडला ;संतप्त शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:57 PM2019-01-24T18:57:39+5:302019-01-24T18:58:35+5:30
कांद्याला भाव नसल्यामुळे बागलाण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे. गुरु वारी कांद्याला शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. यावेळी संचालक मंडळ व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकºयांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन सटाणा मालेगाव रस्ता दीड तास रोखून धरला.
यावेळी एका शेतकºयाने ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्यात येत असताना त्या दिवशी त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यात कांदा आंदोलन पेटले असून शेतकºयांची समजूत घालताना प्रशासनाच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. आगामी काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. बागलाण तालुक्यात पावसाळी रांगडी व उन्हाळी अशा तिन्ही प्रकारच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.त्यापैकी उन्हाळी कांद्याची चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते.या वर्षी जवळपास संपूर्ण वर्षभर कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने कांदा चाळीतच खराब झाला आहे.दुसरीकडे शेतातील नवीन मालालाही बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.अशातच गुरु वारी (दि.२४) येथील बाजार समतिीत कांदा लिलाव सुरू होताच येथील मुंजवाड येथील गोकुळ पवार या शेतकºयाच्या नवीन कांद्यास शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला.इतर शेतकºयांनाही हाच अनुभव येत असल्याने संतप्त शेतकºयांनी बाजार समिती सभापती व सचिवांच्या कार्यालयात जाऊन याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला.यावेळी शासनाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देत शेतकºयांनी तब्बल दीड तास तास वाहतूक रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.