कांदा साठ्याची आता दररोज होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:20 AM2019-12-08T00:20:35+5:302019-12-08T00:21:29+5:30

लासलगाव : कांदा साठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले असून, कांदा साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Onion stocks are being inspected daily | कांदा साठ्याची आता दररोज होणार तपासणी

कांदा साठ्याची आता दररोज होणार तपासणी

Next
ठळक मुद्देप्रशासनाची करडी नजर । अतिरिक्त साठा दिसल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : कांदा साठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले असून, कांदा साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी (दि. ६) आदेश जारी करून महाराष्ट्रातील सर्व कांदा साठा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा पुरवठा विभागाचे पी. टी. महाजन यांनी लासलगाव येथे स्थानिक महसूल मंडल निरीक्षक व तलाठी यांच्यासोबत साठा तपासणी केली आहे.
शासनाने यापूर्वीच दि. ३ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी करून साठवणुकीवर असलेली मर्यादा घटविली आहे. राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर किरकोळ विक्र ेत्यांना पाच टनापेक्षा जास्त कांद्याचा साठा ठेवता येणार नाही. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुक्यातील कांदा साठा तपासणी दररोज करून अद्ययावत साठा माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी निफाड तालुक्यातील महसूल मंडल निरीक्षक यांनी कांदा साठवणुकीची सविस्तर माहिती अहवालात देण्याचे व अतिरिक्त साठा दिसल्यास लागलीच जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसंवत, विंचूर, निफाड, सायखेडा यांसह खेरवाडी भागातही ही तपासणी त्या-त्या स्थानिक महसूल मंडळ निरीक्षक यांना दररोज तपासणी करून किती खरेदी व कांदा पाठवणी झाली याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच अतिरिक्त साठा दिसला तर लागलीच स्थानिक पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल पाठवावा लागणार आहे.
दरम्यान लासलगाव परिसरातील कांदा खरेदीदार व्यापारी यांच्या कांदा खळ्यावर किती कांदा आहे व शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक साठा आहे का याबाबत निफाड येथील सहकार खात्याचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या विशेष पथकाने अचानक पाहणी करून तपासणी केली. साठेबाजांवर निर्बंध
सध्या बाजारात कांद्याचा तुटवडा असून, कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे हे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नवी उपाययोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाºयांना जास्त कांदा साठवून ठेवता येणार नाही. घाऊक आणि किरकोळ व्यापाºयांसाठी असलेली कांदा साठविण्याची मर्यादा ५० टक्क्यांनी घटवून अनुक्र मे २५ आणि पाच टक्के करण्यात आली आहे.

Web Title: Onion stocks are being inspected daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.