वणी उपबाजारात कांद्याला विक्रमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:23 PM2019-11-02T22:23:17+5:302019-11-02T22:24:49+5:30
वणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा दर मिळाल्याने विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा दर मिळाल्याने विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे.
शनिवारी अवघ्या २० वाहनांतून ३५० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६११६ रुपये, किमान ५१५६, तर सरासरी ५७५६ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. देशभरात तेथून कांद्याची मोठी निर्यात केली जाते. मात्र तेथेही पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे देशभरात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. कांद्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने दर तेजीत असल्याचे एका स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने अजून काही दिवस पर्जन्याचा अंदाज वर्तवल्याने कांदा दरवाढीचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कांदा खरेदी - विक्रीच्या व्यवहारात तेजीचे वातावरण दिसून येत आहे.लासलगाव येथे
५३६९ रुपये क्ंिवटल
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रुपये दर जाहीर झाला. नीचांकी कांदा आवक होऊन या हंगामात दि. १९ सप्टेंबर रोजी ५१०० रुपये दर होता. शनिवारी सकाळ सत्रात २१ वाहनांतील २३७ क्विंटल आवक झाली. त्यामुळे कांद्याला किमान १८९१ ते कमाल ५३६९ रुपये, तर सरासरी ४९०१ भावाने विक्र ी झाला. शुक्र वारी (दि. १) २४९२ क्विंटल आवक होऊन लिलावात किमान २१०० ते कमाल ४८०१ व सरासरी ४५५१ रुपये भाव मिळाला होता. गुरुवारी कांदा आवक कमी झाल्याने व दक्षिणे-कडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रुपयांची कमाल दरात तेजी होती.