कांद्याचे अनुदान लवकरच खात्यावर

By admin | Published: July 8, 2017 10:46 PM2017-07-08T22:46:57+5:302017-07-08T22:46:57+5:30

लासलगाव : विक्री केलेल्या कांद्याचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

The onion subsidy will soon be on the account | कांद्याचे अनुदान लवकरच खात्यावर

कांद्याचे अनुदान लवकरच खात्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारात जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये विक्री केलेल्या कांद्याचे अनुदान लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.
२०१५-१६ मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाल्यामुळे खर्चापेक्षाही कमी बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी म्हणून बाजार समितीच्या सदस्य मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कांदा बाजारभावाबद्दल उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली होती. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पणनमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून कांदा परिस्थिती व लिलाव कामकाजाबद्दल माहिती दिली होती. मंत्री परिषदेच्या
बैठकीत जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये लासलगावसह राज्यातील कृषी
उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० व जास्तीत जास्त २०० रुपये क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर निर्णयाच्या अनुषंगाने शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने पणन संचालनालयामार्फत सदर कालावधीत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांकडून अनुदान
मिळण्यासाठी अनुदान मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या
होत्या.

Web Title: The onion subsidy will soon be on the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.