कांदा घसरला; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:55 PM2020-02-25T22:55:00+5:302020-02-26T00:13:09+5:30

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे.

The onion surrounded; Farmers worried | कांदा घसरला; शेतकरी चिंतित

कांदा घसरला; शेतकरी चिंतित

Next
ठळक मुद्देयेवला : निर्यातबंदी उठविण्याची मागणी; खर्च भरून निघेना

राजापूर : येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. खर्चही भरून निघेल की नाही, याची चिंता सतावत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. पांढऱ्या सोन्याला फक्त पाच हजारापर्यंत दर असून, व्यापारी मनाचा दर शेतकऱ्यांना देत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकºयाची आहे, परंतु सध्या लागवड केलेल्या कांदा लागवडीमध्ये साधारण शेतकºयांची दहा गुंठ्यापासून तर एक एकरापर्यंत कांदा लागवड झालेली आहे. उत्पादनही भरघोस निघाले आहे, मात्र दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राजापूर येथे सध्या थोड्याफार प्रमाणात का होईना कांदा काढणीला सुरु वात आहे. त्यातच मजुरीचे दर हे वाढल्याने अडचणीत भर पडली आहे. यावर्षी हवामान बदलामुळे कांदा पिकाला जगविण्यासाठी कीटकनाशक व फवारणीचा मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असताना या हजार ते पंधराशे रु पये दरामध्ये केलेला खर्च वसूल होतो की नाही यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळेल असे धोरण अवलंबून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी सध्या शेतकºयांची आहे.
सध्या कांद्याचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने कांद्याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे, परंतु दर कमी होत असल्याने केलेला खर्चही वसूल होतो की नाही, याची चिंता लागली आहे. हजार ते पंधराशे रु पये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवावी, जेणेकरून शेतकºयांना दोन पैसे मिळतील व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.
- गोकुळ वाघ, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर

Web Title: The onion surrounded; Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.