कांदा व्यापाऱ्याला दोन कोटींना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:05 AM2019-08-28T01:05:59+5:302019-08-28T01:06:31+5:30
आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाखलगाव शिवारात राहणाºया कांदा व्यापाºयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा कांदा विक्रीसाठी दिल्लीत पाठविला. यानंतर एका दुस-या कांदा व्यापा-याने सुरुवातीला त्याबदल्यात ५० लाख रुपयांची रक्कम दिली, मात्र त्यानंतर विश्वासघात करत सुमारे २ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाखलगाव शिवारात राहणाºया कांदा व्यापाºयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा कांदा विक्रीसाठी दिल्लीत पाठविला. यानंतर एका दुस-या कांदा व्यापा-याने सुरुवातीला त्याबदल्यात ५० लाख रुपयांची रक्कम दिली, मात्र त्यानंतर विश्वासघात करत सुमारे २ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लाखगाव येथे राहणारे मुनाफ अब्दुल सौदागर यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सईद के वारसी ऊर्फ (अली हुसेन) याने खोटे नाव सांगत एका व्हेजिटेबल कंपनीत व्यवस्थापक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. मागील वर्षी डिसेंबर ते एप्रिल २०१९ या कालावाधीत लाखलगाव येथून एका कांदा एजन्सी ओखलामंडी दिल्ली व पश्चिम बंगाल येथे सुमारे ७७ ट्रकमध्ये कांदा भरून पाठविला. या कांदामालाची कुठलीही रक्कम गुडगावच्या अली हुसेन याने दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पाठविलेल्या कांद्याची रक्कम परत केली नाही म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर पुढील तपास करत आहे.